skip to main |
skip to sidebar
मस्त चारोल्या
- एकटं जगताना कधी गरज भासते सोबतीची ... जमत जाते दोस्ती, जुळत जातात नाती, एक वेळ येते वाटंत, बरी होती वाट एकट्याची !!
- जीवन असच जगाव दु:ख विसरुन सुखाकडे पळाव पळता पळता ठेच लागली की फक्त आई ग....म्हणाव जीवन असच जगाव
- राहुन-राहुन मला तिची आठवण येते, माझ्या सर्वांगाला शहारुन जाते, ती आता सोबत नाही माझ्या, या वास्तवानेच मला रोज जाग येते
- पाऊस तिला आवडायचा, तिच्या सोबत ब्रसताना तोही बागडायचा, तोही माझ्या सारखा तिच्या प्रेमात पडलेला, जमीनीवर आदळतानाही हसतच रहायचा
- मनातही मन गुंतुन जात जेव्हा मनातल्या आठवणी मन आठवत राहत ते मनालाही कळत नाही।।
- क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल तर क्षितीज नक्की गाठता यॆत ... आपल्या रक्तातच धमक असॆल तर जगंही जिंकता यॆत ...