Sunday, July 27, 2008

मस्त चारोल्या

  • एकटं जगताना कधी गरज भासते सोबतीची ... जमत जाते दोस्ती, जुळत जातात नाती, एक वेळ येते वाटंत, बरी होती वाट एकट्याची !!
  • जीवन असच जगाव दु:ख विसरुन सुखाकडे पळाव पळता पळता ठेच लागली की फक्त आई ग....म्हणाव जीवन असच जगाव
  • राहुन-राहुन मला तिची आठवण येते, माझ्या सर्वांगाला शहारुन जाते, ती आता सोबत नाही माझ्या, या वास्तवानेच मला रोज जाग येते
  • पाऊस तिला आवडायचा, तिच्या सोबत ब्रसताना तोही बागडायचा, तोही माझ्या सारखा तिच्या प्रेमात पडलेला, जमीनीवर आदळतानाही हसतच रहायचा
  • मनातही मन गुंतुन जात जेव्हा मनातल्या आठवणी मन आठवत राहत ते मनालाही कळत नाही।।
  • क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल तर क्षितीज नक्की गाठता यॆत ... आपल्या रक्तातच धमक असॆल तर जगंही जिंकता यॆत ...

Monday, April 21, 2008

Wednesday, April 09, 2008

Thursday, April 03, 2008

एक छान कवीता

आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत

रिमझिम सरींनी छेडलं होतं .

भर दुपारी मला जणू

चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत

श्रावण धुंद बहरला होता .

ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने

ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत

दोघे व्याकुळ झालो होतो .

तुझा गंध वेचता वेचता

मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत

भावनांनी कविता रचली होती .

माझ्या डोळ्यात तू अन

तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत

आणखी काय घडलं होतं ?

मला स्मरत नाही पुढचं

बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं .



-
संदिप खरे